होम > Events
दिनांक 2025/07/23 , 11:00 AM
महात्मा फुले शिक्षण संस्था
क्रांतीसुर्य महात्मा फुले मार्ग, रेशीमबाग चौक, नागपूर.
श्री. संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी
महात्मा फुले शिक्षण संस्था व श्री. संत सावता बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने श्री. संत शिरोमणी सावता महाराज पुण्यस्मरण सोहळा संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात बुधवार दिनांक २३/०७/२०२५ ला साजरा करण्यात आला सकाळी ८:३० वाजता ह. भ. प. श्री. शरदरावजी बावने महाराज यांच्या शुभहस्ते घटस्थापना करून अध्यात्मिक कार्य समितीचे प्रमुख ह. भ. प. श्री. चिंतामणजी मानकर महाराज यांच्या प्रवचनाद्वारे कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राक्षाळ पूजेचे भजन ह. भ. प. शरदराव बावने महाराज व सहकारी मंडळी यांनी केले. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक समितीद्वारे भजन संध्या श्री. शरदरावजी चांदोरे व सहकारी मंडळी (महात्मा फुले सांस्कृतिक समिती) तसेच माळी समाजातील कलावंतांद्वारे सादर करण्यात आला. उपस्थित सर्व समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
पुण्यस्मरण सोहळ्याला महात्मा फुले शिक्षण संस्था व श्री संत सावता बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच माजी आमदार मा. श्री. अशोकराव मानकर, श्री. महादेवराव हरणे, श्री. महादेवराव झाडे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार, कार्याध्यक्ष प्रकाश देवते, उपाध्यक्ष गुलाब चिचाटे, सरचिटणीस रवींद्र अंबाडकर, कोषाध्यक्ष प्रा. मुकेश घोळसे, सहचिटणीस रमेश राऊत व संचालक सर्वश्री सुनिल चिमोटे, अजय गाडगे, कृष्णा महादुरे, शरद चांदोरे, राजेंद्र पाटील, मोहीत श्रीखंडे, डॉ. अभिजीत पोतले, प्रकाश बोबडे, राजेंद्र वाघे, नंदू कन्हेर, प्रा. पंकज कुरळकर, देवेन्द्र काटे, श्रीमती शोभाताई लेकुरवाळे, प्रा. डॉ. अलकाताई झाडे, सौ. माधुरीताई गणोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.