होम > उपक्रम व बातम्या

महात्मा फुले शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन 2025 साजरा

2025/08/15



महात्मा फुले शिक्षण संस्था रेशीमबाग चौक नागपूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमीत्त दरवर्षी प्रमाणे १५ ऑगस्टला सकाळी ११:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार यांचे हस्ते झेंडा पूजन करून झेंडा वंदन (ध्वजारोहण) करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, झेंडागीत म्हणून राष्ट्रध्वजाला उपस्थितांकडून सलामी देण्यात आली व देशभक्तीपर नारे देण्यात आले. संस्थेच्या परिसरातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांच्या पुतळ्यास अनुक्रमे श्री. श्यामरावजी नागपासे व  विजयाताई मारोटकर यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन करून माल्यार्पण केले. या प्रसंगी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार, कार्याध्यक्ष प्रकाश देवते, उपाध्यक्ष गुलाब चिचाटे, सरचिटणीस रवींद्र अंबाडकर, कोषाध्यक्ष प्रा. मुकेश घोळसे, सहचिटणीस रमेश राऊत  व संचालक सर्वश्री सुनिल चिमोटे, अजय गाडगे, कृष्णा महादुरे, शरद चांदोरे, राजेंद्र पाटील, मोहीत श्रीखंडे, डॉ. अभिजीत पोतले, प्रकाश बोबडे, राजेंद्र वाघे, नंदू कन्हेर, प्रा. पंकज कुरळकर, देवेन्द्र काटे, श्रीमती शोभाताई लेकुरवाळे, प्रा. डॉ. अलकाताई झाडे, सौ. माधुरीताई गणोरकर तसेच समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.

  फोटो गैलरी
  वीडियो गैलरी
  सुवर्ण महोत्सवी वर्ष क्षणचित्रे