होम > उपक्रम व बातम्या

महात्मा फुले शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीआई फुले जयंती साजरी

2024/01/03महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, नागपूर येथे बुधवार दि 3 जानेवारी 2024 ला क्रांतिज्योती सावित्रीआई फुले जयंतीदिनी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या पुतळ्यास दक्षिण नागपूर चे आमदार श्री मोहनजीं मते व संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुणजी पवार यांच्या शुभहस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश देवते, उपाध्यक्ष श्री गुलाबराव चीचाटे, माजी नगरसेविका सौं दिव्या धुरडे, उषाताई पायलट, देवेंद्रजी दस्तुरे, मंगलाताई मस्के,ज्योती देवघरे,सुनंदाताई नाल्हे, संस्थेचे सहचिटणीस श्री रमेश राऊत, कोषाध्यक्ष प्रा मुकेश घोळसे, संचालक श्री सुनील चिमोटे, श्री अजय गाडगे, श्री राजेंद्र पाटील, डॉ प्रा. अभिजित पोतले, श्री देवेंद्र काटे, श्री मोहित श्रीखंडे, श्री नंदू कण्हेर, संचालिका श्रीमती शोभा लेकुरवाळे, सौं.रंजना कडुकर व मोठया प्रमाणात समाज बांधव - भगिनी उपस्थित होते

  फोटो गैलरी
  वीडियो गैलरी
  सुवर्ण महोत्सवी वर्ष क्षणचित्रे