होम > संस्थे विषयी

संथेविषयी

महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशिमबाग, नागपूरची अभिनव वाटचाल

सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुलेंच्या शिक्षण संबंधी विचार धरुन माळी समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांकरीता शिक्षणाची सोय करुन त्यांच्यात समातर, बंधुत्व वसहकार्याची भावना निर्माण करुन राष्ट्रीय पुनर्निमाणाचे कार्यास कार्यप्रवन करणे शहरी भागात शिक्षण घेण्याकरिता वसतीगृहाच्या माध्यमातून निवासाची सोय व्हावी या उद्देशाने समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांनी १९५८ रोजी प्रभात पट्टनच्या अधिवेशनातून महात्मा फुलेंचे स्मारक व छात्रावास निर्माण करण्याची योजना तयार केली.

दि ७/१२/१९५८ रोजी महात्मा फुले शिक्षण संस्था या नावाने संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेच्या घटना प्रारुपास मंजूरी देवून १९६० ला महात्मा फुले शिक्षण संस्थेची, सोसायटी रजि नं, अक्ट न. १८६० अन्वये कायदेशीर नोंदणी झाली. संस्थेचे कामकाज करण्यासाठी ५/१२/६० ते १६/९/६२ करीता पहिली कार्यकारिणी निवडण्यात आली त्यावेळी फक्त संस्थेचे १५० आजीवन सभासद होते. समितीने दि. ६/८/६१ रोजी भूखंडाकरीता ना.सु.प्र. कडे अर्ज सादर केला. पब्लिक ट्रस्ट अक्टनुसार संस्था पंजीकृत करण्यात आली. १९६२ मधे संस्थेला ना.सु.प्र. कडून रेशीमबाग विद्यानगरी नागपूर येथे ३४९८६ चौ.फुटाचा भूखंड रु.४०००त भूखंड मिळाला समितीने घरोघरी , गावोगावी जावून मिळेल ती वर्गणी समाजबांधवाकडून एकत्र केली. १९७२ मधे अखिल भारतीय क्षत्रिय माळी, सैनी, मरार शिक्षण परिषद चे २८ वे अधिवेशन संस्थेच्या भूखंडावर भरविण्यात आले. डॉ केशवराव यावलकर यांचे अध्यक्षतेखाली स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. कालारुपाने संस्थेच्या आजीवन सभासदांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत गेली. समाज भवनाच्या निर्मितीकरिता डॉ. केशवराव 'यावलकरयांनी १९८८ मध्ये रु. ५१,०००/- देणगी व सौ. प्रमिलाताई हिवसे यांनी रु. ६१०००/- ची देणगी संस्थेला दिली. समाजबांधवाकडून २,६७,७८४/- रुपये गोळा करुन बांधकामास सुरवात झाली.

समाजातील गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्काराची योजना श्री. विठ्ठलराव कुरळकर यांनी रु २३,०००/- ची देणगी ने प्रारंभ झाली. १९९१ ला विठ्ठलराव कुरळकर वाचनालयाचे उद्‌घाटन झाले. १९९२ साली नवनिर्मित सभागृहाचे उद्घाटन मा.ना. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री महाराष्ट्राज्य व महसूलमंत्री मा. ना. छगनराव भ्रुजबळ यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. मुख्यमंत्री निधीतून सभागृह निर्मिती करीत रु. दहा लाख व वसतीगृह निर्मिती करीता रु. पाच लाख रुपयाची देणगी संस्थेला प्राप्त झाली. १९९३ साली गृहनिर्माण मंत्री मा.ना. छगनराव भुजबळ यांच्या हस्ते महिला कर्मचारी वसतिगृहाचे भूमीपूजन करण्यात आले. संस्थेची उत्त्तरोतर प्रगती होवून २०१० मधे संस्थेनी सुवर्णमहोत्सवात पदार्पण केले त्यापूर्वी संस्थेनी महात्मा फुले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण व्यवसाय व प्रशिक्षण अभ्यासक्रम, ३ डी अँनिमेशन व ग्राफिक्स, ब्युटीकल्चर अभ्यासक्रम सुरु केले.

सुवर्णमहोत्सवात काळात संस्थेनी विभिन्न शैक्षणिक स्पर्धेचे आयोजन, कवीसंमेलन, साहित्य संमेलनांचे आयोजन केले. सन २०१० साली संस्थेचे स्वर्णमहोत्सव मा. ना. छगनराव भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. आज संस्थेनी अलौकीक प्रगती केली आहे. संस्था राबवित असलेले शैक्षणिक व सामाजिक उपक॒म - महात्मा फुले स्मृतीदिनी २८ नोव्हेंबर रोजी दानशूर व्यक्तिनी दिलेल्या देणगीतून येणारे व्याजातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आर्थीक मदत दिल्या जाते. समाजबांधवांनी संस्थेला या उपकमाकरीता रुपये ८,१३,३०२/- देणगी दिली आहे.

महात्मा फुले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय - महाविद्यालयातून व्यावसायिक अभ्यासक्रम बी. बी. ए. बीसी. सी. ए. व बी. सी. ए. सुरु केले.

महात्मा फुले इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी -या उपक्रमातून विद्यार्थाना सन २००९ पासून तांत्रिक शिक्षणाची प्रकिया निरंतर सुरु आहे. ३ डी ऍनिमेशन या ग्राफिक्स पाठ्यक्रम सुरु आहे.

सावित्रीबाई फुले खाजगी आय. टी. आय. -केंद्र सरकार योजना अंतर्गत संस्थेला सन २०१५ इलेकट्रीशियन व सिव्हिल ड्राफ्ट्समन हे दोन ट्रेंड मीळाले. विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

सावित्रीबाई फुले महिला कर्मचारी वसतिगृह -नौकरी करीत असलेल्या महिला कर्मचारी व शिक्षण घेत असलेलल्या ११० विद्यार्थानी वसतिगृहात राहत आहेत.

महात्मा फुले ग्रंथालय व कै. कुरळकर सार्वजनिक वाचनालय - वाचनालय तर्फे विद्यार्थी व विद्यार्थिनींना अभ्यास करीत अभ्यासिक सुरु काण्यात आली आहे. जवळ पास ४०० विद्यार्थी विद्यार्थीनी अभ्यासिकेचा रोज लाभ गेत आहे. स्पर्धेकरिता बसण्यासाठी मार्गदर्शन व पुस्तकाची सोया करण्यात आली आहे.

सामाजिक उपक्रम -शिक्षण संस्थेतर्फे दरवर्षी माळी समाजातील विवाहइच्छूक उपवधू - वर परिचय संमेलन २५ डिसेंबर रोजी संस्थेच्या सांस्कृतिक समगृहात घेतल्या जातो त्या मेळाव्यात जवळपास १५०० युवक युवती सहभाग घेतात.

सामुहिक विवाह सोहळा -दरवर्षी रामनवमीला नि:शुल्क सामूहिक विवाह माळी समाजाकरिता आयोजित केला जातो.

समाज जागरण मासिक - महात्मा फुले शिक्षण संस्थेचे मुखपत्र समाज जागरण मासिकाचे २००९ पासून प्रकाशन होत आहेत. महात्मा फुले शिक्षण संस्थेचे होणा - या उपक्रमाची माहिती या मासिकाच्या माध्यमातून समाजबांधवापर्यंत पोहचत आहे प्रा. संजय नाथे मुख्य संपादक यांचा मार्गदर्शनाखाली उत्तम दर्जेदार लेख, कविता, वार्तापत्र समाजापर्यंत पोहचवण्याचे काम समाज जागरण मासिकाच्या माध्यमातूनसंस्था करीत आहे. आहे.

आज घडीला संस्थेचे १३,३०४ आजीवन सभासह झालेला आहेत ६० पूर्वी लावलेल्या रोपटयाचे वटवृक्षात रूपांतरण झाले आहे. समाजबांधवानी ६० वर्षापूर्वी लावलेला वृक्ष फळे देत आहे व आजची युवापिढी त्याचा आस्वाद घेत आहे. __________

(रविन्द्र अंबाडकर)
सरचिटणीस
महात्मा फुले शिक्षण संस्था
रेशिमबाग नागपूर
मो. न. ९४२२१०१७१७

(प्रा. अरुण पवार)
अध्यक्ष
महात्मा फुले शिक्षण संस्था
रेशिमबाग नागपूर
मो. न. ९८२२६९७९९

महात्मा फुले यांचे स्मारक,चात्रालायचा रूपाने नागपुरात नगरीत उभ्रावे अशी प्रेरणा दि.२४/०५/१९५८ रोजि प्रभात पत्तन जी.बैतुल येथे भरलेल्या सामाजिक परिषदेचा अधिवेशनात मिळाली. तसा निर्णय घेण्यात आला. निर्णयाची अंबलबजावणी करण्याकरिता एका समिती स्थापन करण्यात आली.त्यात श्री माधवराव बनकर(समिती आध्यक्ष).श्री कृष्णराव वादबुथे(सदस्य) श्री लक्ष्मणराव अलोणे (सदस्य) यांचा समवेश होता.

कर्मचारी वर्ग
महात्मा फुले शिक्षण संस्था
१. श्री. प्रकाश प्रल्हादराव मख – कारकून नियुक्ती दिनांक : २४.४.२००१
२. श्री. अनिल नाथ्थूजी वानखडे – सहाय्यक नियुक्ती दिनांक : ०१.०५.१९९५
३. श्री. विनोद भैय्याजी वरंभे – इलेक्ट्रिशन नियुक्ती दिनांक : ३१.०१.१९९६
४. श्रीमती ज्योती एस गणवीर –


कार्यकारी मंडळाचे सदस्य कार्यकाळ १९६० ते २०१०


पदाधिकारी व कार्यकारी सदस्य १९६० ते २०१०

  बातम्या

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित भव्य स्कूटर रॅली


पूर्ण वाचा   

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन


पूर्ण वाचा   

  EVENTS

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्य भव्य स

  दिनांक 2022/04/11,    07:00 PM
  महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशिमबाग नागपूर

पूर्ण वाचा   

आमसभा, महात्मा फुले शिक्षण संस्था, विद्यानगरी, रेशीमबाग

  दिनांक 2018-12-15,    10:30 AM
  महात्मा फुले शिक्षण संस्था, विद्यानगरी, रेशीमबाग चौक, नागपूर

पूर्ण वाचा   

  फोटो गैलरी
  वीडियो गैलरी
  सुवर्ण महोत्सवी वर्ष क्षणचित्रे