होम > Events

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्य भव्य स्कूटररैली

  दिनांक 2022/04/11 ,     07:00 PM
  महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशिमबाग नागपूर

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्य ११ एप्रिल २०२२ सकाळी ८.३० वाजता महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशिमबाग नागपूर व माळी महासंघ, नागपूर तर्फे भव्य स्कूटररैली, संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. अरुण पवार यांचे हस्ते संस्थेच्या प्रांगणातील महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांच्या पुतळयांना माल्यापर्ण करुन रैली काढण्यात आली. ही रैली कॉटन मार्केट येथील महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांच्या पुतळयांना माल्यापर्ण करुनरैली चा समारोप करण्यात आला.

या रैलीत प्रामुख्याने माळी समाजातील सर्व संघटनेनी सहभाग घेतला.यात महात्मा फुले शिक्षण संस्था, माळी महासंघ, अखिल भारतीय माळी महासंघ, उन्मन वंशिय विकास संस्था, क्रांतिसूर्य जोतीराव फुले बिजनेस फोरम, माळी विकास संस्था, श्री संत सावता बहुउद्देशिय सेवा मंडळ, विदर्भ माळी कल्याणकारी मंडळ, महात्मा फुले समता परिषद, सावता मित्र मंडळ, क्षत्रिय कोसरे माळी महासंघ, अखिल भारतीय गासे माळी महासंघ, अखिल भारतीय लोणारे माळी महासंघ, मौर्य-काछी-कुशवाहा संघ, उत्कर्ष महिला संघटना, सावित्री ब्रिगेड, मरार माळी विकास संस्था, महात्मा फुले समता शिक्षण संस्था, माळी समाज विकास संस्था इत्यादी संघटनेचे प्रतिनिधी या रेलीत उपस्थित होते. यात प्रामुख्याने विविध पक्षांचे नेते सर्व श्री मा.नागो गाणार, शिक्षक आमदार, मा. मोहन मते, आमदार दक्षिण नागपूर, मा. अशोकराव मानकर, माजी आमदार, मा. अविनाशजी ठाकरे, सत्तापक्ष नेता व माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष, मा. बबनराव तायडे, ओबीसी महासंघ अध्यक्ष, मा. गिरीष पांडव, सामाजिक कार्यकर्ते, मा. सौ. स्वाती आखतकर, नगरसेविका, मा. मनोज गावंडे, नगर सेवक, सौ. उषा पायलट नगरसेविक, नाना लोखंडे, मधुसुदन देशमुख, गुलाबराव नाल्हे, डॉ, सुनंदा नाल्हे तसेच समाज बांधव मोठया संख्येनी उपस्थित होते. स्कुटर रैली च्या यशस्वीते करिता संचालक मंडळ सर्व श्री. कार्याध्यक्ष प्रकाश देवते, उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे, सरचिटणीस रविन्द्र अंबाडकर, सहचिटणीस रमेश राऊत, कोषाध्यक्ष मुकेश घोळसे,थोर महापुरुष जंयती उत्सव समिती संयोजक राजेन्द्र पाटील व सहसंयोजक डॉ. अभिजित पोतले, संचालक सुनिल चिमोटे, अजय गाडगे, कृष्णा महादुरे, शरद चांदोरे, मोहित श्रीखंडे, प्रकाश बोबडे, राजेन्द वाघे, नंदु कनैर, प्रा. पंकज कुरळकर, देवेन्द्र काटे, श्रीमती शोभा लेकूरवाळे, डॉ.अल्का झाडे, सौ. माधुरी गणोरकर तसेच माळी महासंघ नागपूर शहर आघाडीचे पदाधिकरी शंकर चौधरी, राहूल पलाडे, सचिन हिवसे, मिलिंद भोंगाडे, विनित गणोरकर, धनराज फरकाडे, राजु गाडगे, सौ. विजया अंबाडकर, सौ. सुलेखा पवार, सौ. शालिनी पवार, मायाताई हुडे, सौ. नंदा भोयर, सौ. नयना गाडगे, सौ. उज्वला पाटील यांनी अथक परिश्रम
घेतले.


  बातम्या

महात्मा फुले शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीआई फुले जयंती साजरी


पूर्ण वाचा   

महात्मा फुले शिक्षण संस्था ,रेशिमबाग, नागपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती सादर


पूर्ण वाचा   

  EVENTS

युवक युवती परिचय मेळावा

  दिनांक 2023/10/03,    04:15 PM
  फुले शिक्षण संस्था रेशीमबाग नागपूर

पूर्ण वाचा   

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्य भव्य स

  दिनांक 2022/04/11,    07:00 PM
  महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशिमबाग नागपूर

पूर्ण वाचा   

  फोटो गैलरी
  वीडियो गैलरी
  सुवर्ण महोत्सवी वर्ष क्षणचित्रे